🔰 *नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज* ( भारत सरकार , ग्रामीण विकास मंत्रालयअंतर्गत एक स्वायत्त संस्था ) , राजेंद्रनगर , हैदराबाद . ( जाहिरात क्र .१४ / २०२० ) '

✅ *मॉडेल ग्राम पंचायत ( GP ) क्लस्टर्स अक्रॉस इंडिया प्रोजेक्ट'साठी*
*एकूण ५१० पदांची करार पद्धतीने भरती* .

✅ *प्रोजेक्टचे उद्दिष्ट* - देशभरातील २५० क्लस्टर्समधील ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करणे*

🛎️ *पदे- *

 1️⃣*यंग फेलोज* - २५० पदे

✅ *पात्रता -*
अर्थशास्त्र / ग्रामविकास / ग्राम व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / समाजकार्य / डेव्हलपमेंट स्टडीज , इ . विषयांतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण .

( १० वीला किमान ६० टक्के गुण आणि
१२ वी / पदवी / पदव्युत्तर पदवीला किमान ५० टक्के गुण आवश्यक . )

( इंग्रजी / हिंदी भाषेत लिहिण्याचे व बोलण्याचे कौशल्य असणे आवश्यक . )

( स्थानीय उमेदवार आणि अशा क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल . )

निवडलेल्या उमेदवारांना NIRD & PR यांनी आयोजित केलेले इंडक्शन ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करावे लागेल .

✅ *वयोमर्यादा* - दि . २५ जुलै २०२० रोजी २५ ते ३० वर्षे

✅ *मानधन -*
एकत्रित मानधन दरमहा रु .३५,००० / महिन्याला २५ दिवस पूर्ण वेळ काम करण्यासाठी )

2️⃣ *क्लस्टरलेव्हल रिसोर्स पर्सन* - २५० पदे

✅ *पात्रता - *
कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण , सेल्फ हेल्प ग्रुप ( SHG ) ( बचत गटाचे ) प्रमुख म्हणून कामाचा अनुभव .

उमेदवारांना इंग्रजी वाचता येणे आणि हिंदी व स्थानीय भाषेत लिहिता व बोलता येणे आवश्यक ( संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल )

निवडलेल्या उमेदवारांना NIRD & PR यांनी आयोजित केलेले इंडक्शन ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करावे लागेल . ( ग्रामपंचायतींची रचना / कार्य / कर्तव्य यांची माहिती असणे आवश्यक )

✅ *वयोमर्यादा* - दि . २५ जुलै २०२० रोजी ४० वर्षे

✅ *मानधन* -
एकत्रित मानधन दरमहा रु .१२,५०० / ( महिन्याला २५ दिवस पूर्ण वेळ काम करण्यासाठी )

3️⃣ *स्टेट प्रोगाम कोऑर्डिनेटर* - १० पदे

✅ *पात्रता - *
अर्थशास्त्र / ग्रामविकास / ग्राम व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र । समाजकार्य / डेव्हलपमेंट स्टडीज , इ . विषयांतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण .

( १० वीला किमान ६० टक्के गुण आणि
 १२ वी / पदवी / पदव्युत्तर पदवीला किमान ५० टक्के गुण आवश्यक . )

( इंग्रजी / हिंदी भाषेत लिहिण्याचे व बोलण्याचे कौशल्य असणे आवश्यक . )

( स्थानीय उमेदवार आणि अशा क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल . )

निवडलेल्या उमेदवारांना NIRD & PR यांनी आयोजित केलेले इंडक्शन ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करावे लागेल .

✅ *अनुभव -* ग्रामपंचायतीसंबंधित कॅपसिटी बिल्डिंग , ट्रेनिंग इ . चा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक .

✅ *वयोमर्यादा -* दि . २५ जुलै २०२० रोजी ३०-५० वर्षे

✅ *मानधन-* एकत्रित मानधन दरमहा रु .५५,००० /

*सर्व पदांसाठी अपवादात्मक पात्रता असल्यास शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाची अट शिथिल करण्यात येऊ शकते .*

*सुरुवातीला १ वर्षाच्या कराराने भरती केली जाईल , या दरम्यान समाधानकारक कामगिरी बजावल्यास प्रोजेक्टच्या गरजेनुसार कराराचा कालावधी वाढविला जाईल .*

✅ *ऑनलाइन अर्ज*
www.career.nirdpr.in किंवा www.nirdpr.org.in या संकेतस्थळावर*
*दि . १० ऑगस्ट २०२० पर्यंत करावेत .*

*( प्रथम नोंदणीनंतर ऑनलाइन अर्ज ) तांत्रिक अडचणीसाठी career.nirdpr@gmail.com वर आपला नोंदणी क्रमांक आणि पोझिशन इन्फो स्क्रीन शॉटसह संपर्क करा .*